स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन
हिंगोली - जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीक विमा सरसकट देण्यात यावा यासाठी गुरुवारी (ता.७) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी जाऊन घेराव घालून गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले.
जिल्ह्यात मागील वर्षात खरीप हंगामात जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.यासाठी विविध पक्षाच्या नेत्यांनी पीक पाहणी केली होती. त्यानंतर पीक पाहणी प्रयोग विमा कंपन्यांकडून करण्यात आला होता. तर शेतकऱ्यांचे जास्तीचे नुकसान होऊ नये म्हणून पीक विमा कंपनींनीने शेतकऱ्यांना विम्याचा परतावा दिला नाही. तीन वर्षापासून कृषी विभागाकडून व कंपन्यांकडून थट्टा केली जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (ता.३०) डिसेंबर रोजी कृषी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात सात जानेवारी रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने व कृषी विभागाकडून काही प्रयत्न होत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी कृषी अधीक्षक कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला, त्यावेळी मात्र अधिकारी मला या पीक विमा देण्याचा किंवा मंजूर करण्याचा अधिकार नसल्याचे सांगताच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गाडे यांनी जोरजोरात बोलून अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात होते, यावेळी त्यांनी पोलीस विभागाला पाचारण केले. तातडीने पोलीस कर्मचारी दाखल होताच पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत होण्याचे आवाहन केले.
त्यानंतर कृषी अधीक्षक यांनी शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या सरासरी अकडेवारिवर आधारित असून विमा संबंधित मंडळात लागू करण्यात येईल. हंगामातील सोयाबीन पिकांचे संकलन नोंदवही कृषी आयुक्तालयात सादर केली आहे.२०१९-२० मधील वंचित शेतकऱ्यांची यादी बजाज अलायांस कंपनीकडे पाठविले आहे.त्यामुळे
संबंधित विमा कंपनीकडे राहील असे पत्र कृषी विभागाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांना दिली.
यापूर्वी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांनी
एनटीसीतील विमा कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. त्यानंतर पुन्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केल्याचे प्रकरण ताजे असताना आज पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा मिळावा यासाठी आक्रमक पवित्रा घेत कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन केले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गाडे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे,नारायण सावके, बाबुराव मगर, दीपक सावके, माधव सावके यांच्या सह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी अश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.