Posts

Showing posts from December 22, 2020
Image
  महाआवास योजनेत राज्यात प्रथम येण्यासाठी जिल्ह्याने प्रयत्न करावे -  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा परिषदेत महाआवास अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा   हिंगोली,-  महाआवास अभियान  ग्रामीण अंतर्गत जिल्ह्याला दिलेल्या उद्देशाची कामगिरी कौतुकास्पद असून राज्यात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावे असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा परिषदेच्या  जिल्हास्तरीय आयोजित कार्यशाळेत अधिकाऱ्यांना गुगल मिटद्वारे ऑनलाईन सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात जिल्हास्तरीय  कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी सकाळी ११.०० वा करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, आत्माराम बोन्द्रे, डॉ.मिलिंद पोहरे,व्ही.पी. राठोड, उमेश स्वामी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुख्यकार्यकारी अधिकारीराधाबीनोद शर्मा  म्हणाले २०२२ पर्यंत सर्वाना घरकुल मिळावे या अनुषंगाने महाआवास अभियान अतिशय महत्व पूर्ण असुन तालुक्याने त्या अनुषंगाने नियोजन करावे अशा ...

हिंगोली - लाचखोर तलाठ्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

  लाचखोर तलाठ्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी  हिंगोली -    ऑनलाइन फेरफार करण्यासाठी एका शेतकर्यांकडून पाच हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यास मंगळवारी (ता.२२) रोजी  न्यायालयासमोर उभे केले असता लाचखोर तलाठयास चौदा दिवसांची न्यायालय कोठडी देण्यात आली असून त्यास परभणी कारागृहात रवानगी केली आहे. कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील तलाठी बेले  यांनी तक्रार दाराच्या शेताचे ऑनलाईन फेरफार मध्ये दुरुस्ती करून देतो म्हणून पाच हजाराच्या लाचेची मागणी तक्रादाराकडे केली होती.तसेच तहसील कार्यालयातील ऑनलाईनची कामे करणारे कोतवाल हमीद यांच्याकडे रकम देण्याचे सांगितले होते.त्यानुसार तक्रारदाराने १६ डिसेंबर रोजी तलाठी बेले यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत कार्यालयात केली. त्यानुसार   लाचलुचपत विभागाचे प्रभारी पोलीस उपधीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने या प्रकरणी पडताळणी केली असता यात कोतवाल हमीद याने पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे स्पस्ट झाले.यावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला होता.यावरून त्या लाचखोर बेले तलाठी व कोतवाल हमीद य...