हिंगोलीत खून प्रकरणी नऊ जनावर गुन्हे दाखल
हिंगोलीत खून प्रकरणी नऊ जनावर गुन्हे दाखल हिंगोली - शहरातील पारधीवाडा येथे एका कार्यक्रमात जुन्या वादावरून एकाचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी नऊ जणाविरुद शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील पारधीवाडा येथे गुरुवारी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात जुन्या वादावरून सुनील चव्हाण यांच्यावर सचिन पवार यांच्या घरासमोर अजय चव्हाण, ऋतीक चव्हाण, अर्जुन काळे, राहुल काळे, सुनील चव्हाण, सचिन पवार, अन्य तीघे सर्व राहणार पारधीवाडा यांनी संगणमत करुन सुनील चव्हाण वय २८ यांच्यावर हल्ला करून जुन्या वादावरून तलवार, चाकु, लोखंडी पाईप व गुप्तीने गंभीर जखमी करुन खून केला. या प्रकरणी मयत सुनील चव्हाण यांची पत्नी निशा सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नऊ जणाविरुद विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. इतरही आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी एसडीपीओ यतीन देशमुख, पोलीस निरीक्षक सय्यद आदींनी भेट दिली आहे.