कळमनुरी, ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान
४० रक्तदात्यांनी केले रक्तदान कळमनुरी - जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने गरजू रुग्णांना याचा लाभ मिळावा यासाठी शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिक्षण माध्यमातून देशाचे भविष्य बळकट करण्याच्या उद्देशाने युवा पिढीला मार्गदर्शित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे मूल्यवान कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्र कळमनुरीचे संचालक प्रा.भगवान मस्के यांनी १० ऑक्टोंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोनाव्हायरस संसर्गजन्य महामारी मुळे देशाची परिस्थिती नाजूक झाली असून कोरोना वर मात करण्यासाठी सर्व ताकदीने लढा देणाऱ्या आरोग्य विभागाला आपल्या हातून तुटपुंजी सहकार्य व्हावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले, शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले याप्रसंगी प्रा. भगवान मस्के यांनी आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करून मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले...