जामठी येथे विधवा महिलेचा विनयभंग करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
जामठी येथे विधवा महिलेचा विनयभंग करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल मानवहित लोकशाही कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे आरोपीना अटक सेनगाव -( बबन सुतार ) तालुक्यातील जामठी येथील अनुसूचित जातीतील समाजाची विधवा महिला आपल्या मुलाबाळांसह घरात झोपली असताना गावातील उच्चवर्णीय जातीतील एकाने तिच्या घरात अनधिकृतरित्या प्रवेश करून तिचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केले असल्याने त्या दोषींविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील गोरेगाव ठाणे हद्दीत येत असलेल्या जामठी येथील अनुसूचित जाती समाजातील ४० वर्षीय विधवा महिला आपल्या दोन मुलाबाळांसह घरात झोपलेली असताना गावातील आरोपी यादव पांडुरंग शिंदे यांनी वसरी कडील दरवाजाची कडी खोलून अनधिकृतरित्या घरात प्रवेश केला आपल्या घरात कुणीतरी आले असल्याचा आवाज पीडित महिलेच्या कानी पडतात ती झोपेतून जागे होऊन दरवाजा जवळ आली असता तिला गावातील उच्चवर्णीय मराठा जातीतील यादव पांडुरंग शिंदे हा आला असल्याचे दिसून आल्याने पीडित महिले...