Posts

Showing posts from October 10, 2020

अनुकंपाधारक ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची  बुधवारी होणार तपासणी

अनुकंपाधारक ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची  बुधवारी होणार तपासणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी यांची माहिती हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या २०१९-२० चालू वर्षासाठी शासन तरतुदीनुसार अनुकंपा उमेदवारांची निवड व नियुक्ती प्रक्रिया देण्याची कारवाही सुरु आहे. त्यामुळे जुलै२०२० अखेर अनुकंपाधारक उमेदवारांच्या जेष्ठता यादीतील ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी बुधवारी( ता.१४) षट्कोनी सभागृहात सकाळी नऊ वाजता केली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी यांनी सांगितले. मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या अनुकंपा धारकांच्या व सेवा जेष्ठता यादीनुसार जागा भरल्या जात नव्हत्या ,त्यातच पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने ही प्रक्रिया थंडावली होती. आता कोरोना संसर्ग प्रमाण कमी अधिक असल्याने शासनाने जेष्ठता यादीनुसार अनुकंपा धारकांची निवड प्रक्रिया राबवून नितुक्ती देण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जुलै २०२० अखेर अनुकंपा धारक जेष्ठता यादीतील ७० उमेदवारांचा यात समावेश आहे. ही प्रक्रिया बुधवारी (ता.१४) सकाळी नऊ वाजता जिल्...