Posts

Showing posts from October 8, 2020

हिंगोलीतील उद्योजकाची साडे तीन कोटीची फसवणुक करणाऱ्या पुणे येथील दांपत्या विरुध्द गुन्हा

हिंगोलीतील उद्योजकाची साडे तीन कोटीची फसवणुक करणाऱ्या पुणे येथील दांपत्या विरुध्द गुन्हा हिंगोली -  हिंगोलीच्या उद्योजकाकडून पोल्ट्री फिड साठी लागणारी १२३३ मेट्रीक टन ढेप खरेदी करून पैसे न देता ३.३५ कोटी रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी पुणे येथील साकार पोल्ट्री प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या संचालक दांपत्यावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील हिंगोली एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत ज्ञानेश्‍वर मामडे यांच्या मालकिची शिवा पार्वती पोल्ट्री फिड प्रायव्हेट लिमीटेड या नावाची कंपनी  मागील अनेक वर्षपासून आहे. या ठिकाणी सोयाबीन पासून पोल्ट्री फिड साठी ढेप तयार केली जाते. सदरील ढेप राज्यभरातील विविध कंपन्यांना मागणी नुसार पुरवली जाते. त्यानुसार पुणे येथील साकार पोल्ट्री प्रा. लिमीटेड साकोरे नगर सोसायटी, लोहगाव पुणे या कंपनीने ढेपेचा पुरवठा करण्याची मागणी शिवा पार्वती कंपनीकडे नोंदवली होती. त्यानुसार सन २०११ पासून त्यांचा व्यवहार सुरु झाला. मात्र  २९ मार्च २०१७ ते १४ जुलै २०१७ या कालावधीत साकार कंपनीला त्यांच्या मागण...