Posts

Showing posts from September 30, 2020

जिल्हाध्यक्षपदी नागेश पुजारी यांची फेर निवड

Image
जिल्हाध्यक्षपदी नागेश पुजारी यांची फेर निवड हिंगोली - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नागेश पुजारी यांची फेरनिवड करण्यात आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद पदवीधर राज्य संघटनेचे अध्यक्ष अतुल मुळे , विष्णू घुगे, पी.एन. गोरले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्हास्तरीय नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी नागेश पुजारी यांची फेर निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी मध्ये सुदाम चव्हाण उपाध्यक्ष, शेख युसूफ गफार सचिव, शेख अनिस सह सचिव,दिलीप नागरे कोषाध्यक्ष ,अशोक वाघमारे जिल्हा संघटक,तर महिला संघटक म्हणून श्रीमती एस. एस.घेणेकर, श्रीमती ए. बी. शिंदे ,संपर्क प्रमुख भागवत भिसडे, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून नागनाथ भोजे यांचा जिल्हास्तरीय नूतन कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. आता तालुकास्तरावर देखील लवकरच नूतन कार्यकारिणी केली जाणार असल्याचे नागेश पुजारी यांनी सांगितले.

महसूल कर्मचारी संघटनेचे आज सामूहिक रजा आंदोलन

Image
महसूल कर्मचारी संघटनेचे आज सामूहिक रजा आंदोलन हिंगोली -  मंडळ अधिकारी संवर्गातून अव्वल कारकून यांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती दयावी या प्रमुख मागणीसाठी  महसूल कर्मचारी संघटनेने गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाकडे निवेदनाद्वारे दिला आहे. शासनाच्या महसूल विभागाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव विभागाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र प्रस्ताव सादर करून आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप पर्यन्त मान्यता न मिळाल्याने महसूल कर्मचाऱ्यात नाराजी पसरली आहे.तसेच प्रस्तावित केलेल्या यादीतील अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झाले असल्याने त्यांना पदोन्नतीच्या लाभापासून वंचित राहावे लागले. राज्यातील इतर विभागातील पदोन्नतीच्या प्रक्रिया  यापूर्वीच झाल्या आहेत, केवळ मराठवाडा विभागातीलकर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.यापूर्वी अनेक वेळा संघटनेने   मंत्रालयात धाव घेऊन  महसूल मंत्री, राज्यमंत्री यांची भेट घेऊन प्रस्तावास मान्यता देण्याबाबत ...