शरीर व मन आयुर्वेद
🟢 शरीर व मन 🟢 आयुर्वेद . शरीरामध्ये भौतिक व आध्यात्मिक असे दोन प्रकारचे घटक असतात. भौतिक घटकांत कफ, वात, पित्त हे त्रिधातू व रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे सात धातू स्नायू इ. उपधातू मलमूत्र इ. मल हे पांच भौतिक विकार असतात. आयुर्वेदामध्ये मनासहित सर्व इंद्रिये भौतिक मानलेली आहेत. यांपैकी मन हे संचारी आहे. मानाचा आणि शरीरघटकांचा अतिशय निकट संबंध आहे. मनाच्या गुणदोषांचे परिणाम शरीरावर होतात व शरीराच्या गुणदोषांचे परिणाम मनावर होत असतात. मनाचे शरीरावर होणारे परिणाम : मनाचा सत्त्व गुण अधिक असेल, तर त्याचे इष्ट परिणाम होत असतात. भक्ती, शील, शौर्य, भय, उत्साह इ. मनापासून उत्पन्न होतात. त्यांत मन भक्तीने शांत, स्थिर, दृढ, एकाग्र निर्व्यथ (व्यथा नसलेले) असे होते. त्याचे परिणाम शरीरघटकांवर इष्ट होऊन पित्त व वात दोष कमी होतात, श्रेष्ठ दर्जाचे कफस्वभावी धातुघटक वाढतात, ते स्निग्ध होतात. दातृत्वाने (शीलाने) शरीर घटक स्निग्धसार होतात, गरजूंची गरज व त्यांचे होणारे हाल किंवा अडचणी ह्यांमुळे मनामध्...