Posts

Showing posts from September 24, 2020

हिंगोली जिल्ह्यात ६३ हजार  कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण

जिल्ह्यात ६३ हजार  कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण   हिंगोली, - जिल्ह्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत (ता.२२) सप्टेंबर अखेर ६३हजार ३३३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणा दरम्यान कोव्हिड आजाराची ८ रुग्ण, इतर आजाराची २ हजार ३१८ रुग्ण असे एकूण २ हजार ३२६ संशयित रुण आढळून आले आहेत. तर कोमार्बीड व्यक्तींची संख्या २५६ एवढी आढळून आली आहे. या सर्व रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करण्यात आल्याचे  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ५९५ पथके स्थापन करण्यात आली असून, या पथकामध्ये एक हजार ७८५ कर्मचाऱ्यांची तसेच प्रत्येक ५ते १० पथकामागे एक याप्रमाणे उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ३७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संशयित रुग्णांना संदर्भीत करण्यासाठी २९ ॲम्ब्युलन्स  उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या मोहिमे दरम्यान गृहभेटीच्या वेळी विरीत करण्यासाटी ३ लाख पाँप्लेट तयार करण्यात आले आहेत. तसेच २५ होर्डींग्ज व दोन हजार साहसे बॅनर्स तयार करण्यात आली आह...

हिंगोलीत  नव्याने २२ पॉझिटिव्ह

Image
हिंगोलीत  नव्याने २२ पॉझिटिव्ह हिंगोली -    जिल्हात गुरुवारी  नव्याने २२ रुग्ण आढळून आले आहेत तर ५१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.  त्यापैकी १२ रुग्ण  रँपीड अँन्टीजन  टेस्टद्वारे आढळून आले. तर  १० रुग्ण  आरटीपीसीआर टेस्ट मध्ये आढळले आहेत. तर ५१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली.    आजपर्यंत जिल्ह्यात एकुण २४७४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २१३७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ३०४ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ३३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.

हिंगोली : पोलीस निरीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी

Image
पोलीस निरीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी हिंगोली - येथील राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक कुंडलिक अंभोरे यांचे बुधवारी सायंकाळी औरंगाबाद येथे  उपचारा दरम्यान मृत्यू झाला.ते औंढा नागनाथ तालुक्यातील गलांडी येथील रहिवासी होते. येथील राज्य राखीव बल गट क्रमांक १२ चे पोलीस निरीक्षक कुंडलिक अंभोरे यांना मागील आठवड्यात कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची तपासणी केली असता  त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते .त्यांनी पन्नाशी ओलांडली होती . त्यामुळे उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, अखेर  त्यांचा कोरोनाने बळी घेतल्याने राज्य राखीव दलात शोककळा पसरली आहे. कुंडलिक अंभोरे हे औंढा तालुक्यातील गलांडी येथील रहिवासी होते. त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ ही अवघा सहा वर्षे बाकी होता . त्यांनी उत्कृष्ट सेवा बाजावल्यामुळे त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र देखील ठरले...