एक लाखाचा धनादेश असताना, केले दोन लाखाचे वितरण बँक ऑफ महाराष्ट्रचा भोंगळा कारभार
एक लाखाचा धनादेश असताना, केले दोन लाखाचे वितरण बँक ऑफ महाराष्ट्रचा भोंगळा कारभार कळमनुरी - येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखेत एका व्यापाऱ्याने एक लाखाचा धनादेश दिला असता कॅशियरने त्याला दोन लाख रुपये दिले असल्याची खळबळजनक बाब कळमनुरी येथे घडली, व्यापाऱ्याच्या स्वभावात असलेल्या ईमानदारी मुळे एक लाख रुपये रक्कम बँकेला परत मिळाली बँकेतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी व निष्काळजीमुळे बँकेच्या व्यवहारावर प्रश्न निर्माण होत आहेत. येथील बँक ऑफ महाराष्ट्र ही शाखा सुरुवातीपासून हिटलर वर्तणुकीची असून ग्राहकांना आपली गरज आहे. आपल्याला ग्राहकांची कधीच गरज भासणार नाही अशी कल्पना येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या वागणुकीत होत आहे ,गर्वाचे घर खाली असते या म्हणीचा खुलासा मात्र १८ सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत दिसून आला गर्वाने व्यासलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना माणुसकीच्या खऱ्या जगाचे दर्शन झाले. शहरातील व्यापाऱ्यांनी आर्थिक अडचणीत सहकार्य मिळावे या उद्देशाने शिव कृपा पुरुष बचत गट निर्माण केले ,हे गट दोन वर्षांपूर्वी शहरातील विश्वासू व...