Posts

Showing posts from September 19, 2020

शनिवारी नव्याने ६९ रुग्ण पॉझिटिव्ह तर २८ रुग्णांना सुट्टी 

शनिवारी नव्याने ६९ रुग्ण पॉझिटिव्ह तर २८ रुग्णांना सुट्टी    हिंगोली - जिल्ह्यात शनिवारी नव्याने ६९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील ५६ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तपासणीत आढळून आले आहेत .तर १३ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. २८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याचे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.   जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शनिवारी ( ता.१९) प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तपासणीत  ५६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसरात ४७ रुग्ण सापडले आहेत, यामध्ये बावन खोली, जिजामाता नगर, तोफखाना, भोईपुरा, जवळा बाजार,अंतुले नगर, बळसोंड आदींचा समावेश आहे. तर वसमत परिसर एक, कळमनुरी परिसर आठ  असे एकूण  ५६ रुग्ण आढळून आले आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण  १३ रुग्ण सापडले असून, यात हिंगोली परिसरातील ५, वसमत परिसर एक, कळमनुरी परिसर सात, अशा एकूण१७ रुग्णांचा समावेश आहे.   तर आज तब्बल २८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोल...