Posts

Showing posts from September 18, 2020

शुक्रवारी नव्याने ४६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ७२ रुग्णांना सुट्टी

शुक्रवारी नव्याने ४६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ७२ रुग्णांना सुट्टी     हिंगोली - जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने ४६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील ३४ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तपासणीत आढळून आले आहेत .तर १२ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. ७२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याचे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी( ता.१८) प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तपासणीत ३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये  वसमत परिसर सहा ,कळमनुरी परिसर २८ असे एकूण ३४ रुग्ण आढळून आले आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण १२ रुग्ण सापडले असून, यात हिंगोली परिसरातील १२ रुग्णांचा समावेश आहे. तर आज तब्बल ७२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील २० ,कोरोना केअर सेंटर वसमत पाच,कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील ४४,तर सेनगाव सेन्टर येथील तीन असे एकूण ७२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णाल...

आसना नदीला महापूर ; कुरुंदा गावाला पाण्याचा वेढा

Image
आसना नदीला महापूर ; कुरुंदा गावाला पाण्याचा वेढा चोहीकडे पाणीच पाणी,अनेकांच्या घरात शिरले पाणी  नामदेव दळवी ------------------  कुरुंदा - वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गुरुवारी रात्री तीन वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे  शुक्रवारी सकाळी आसना नदीला महापूर आल्याने गावाला पाण्याचा वेढा दिल्याने ,चोहीकडे पाणीच पाणी झाले असून अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. दारम्यान ,वसमत परिसरात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाली, यामध्ये गावाजवळ असलेल्या आसना नदीला महापूर आल्याने नदी पात्रात पाणी अधिक झाले ,त्या दाबामुळे बँक वॉटर मुळे नदी काठाच्या शेत जमीनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याने पिकांचे देखील नुकसान झाले आहे. तर कुरुंदवाडी- सेलू पांदण रस्त्याच्या कडून येणाऱ्या नदीपात्रात पुराचे पाणी क्षमतेपेक्षा अधिक झाले, बँकवॉटर मुळे शिरल्याने  काही शेतकऱ्यांच्या पिकांमधून नदीचे पात्र तयार झाल्या सारखे पुराचे पाणी वाहत होते ,तसेच सुकळी कडून  येणाऱ्या नदीपात्रात सुद्धा महापूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातून पुराचे पाट वाहत होते . कुरुंदा येथे...