हिंगोलीत दोघाचा मृत्यु नव्याने २८ पॉझिटिव्ह तर इसापूर येथे एकाची आत्महत्या
हिंगोलीत दोघाचा मृत्यु नव्याने २८ पॉझिटिव्ह हिंगोली - जिल्हातील हिंगोली शहरातील रिसाला बाजार येथील एक व हेमराज गल्ली येथील एक दोघांचे वय ५५ वर्षीय पुरुषांचा कोरोनामुळे मंगळवारी ता. ८ मृत्यु झाला तर नव्याने २८ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीवास यांनी दिली. त्यापैकी दोन रुग्ण रँपीड अँन्टीजन टेस्टद्वारे आढळून आले. तर २६ रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट मध्ये आढळले आहेत. तर ३२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १७७२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १४४२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ३०८ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि २२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला. इसापुर येथे एकाची आत्महत्या हिंगोली - तालुक्यातील इसापुर येथे एकाने शेतातील सामायिक धुर्यावरील लिंबाचा झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात सोमवारी( ता. ८) आकस्मित मृत्युची नोंद झाली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बासंबा पो...