राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश हिंगोली - जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीमध्ये सादर न केल्याचा ठपका ठेवत आंबा जिल्हा परिषद सर्कल मधून निवडूण आलेले राजेंद्र देशमुख यांची जि. प. सदस्य म्हणून झालेली निवड रद्द करून त्यांना सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काढले आहेत. सन २०१७ मध्ये आंबा जिल्हा परिषद गटाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सदर गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होता. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र देशमुख रा. सेलू यांनी आंबा येथील शिल्पा श्रीनिवास भोसले यांचा पराभव करून विजय मिळविला होता. दरम्यान, राजेंद्र देशमुख यांचे जात प्रमाणपत्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काढलेले असून त्यांच्याकडे जातीचे ठोस पुरावे नसल्याची लेखी तक्रार शिल्पा भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते नदाफ म. बशीर खान यांनीही जिल्हा परिषद सदस्य देशमुख यांची निवड रद्द करण्याची मागणी केली. या...