Posts

Showing posts from August 27, 2020

देवणी तालुक्यातील 9 तांड्यावर गोर सेना शाखा  फलकाचे अनावरण

Image
*देवणी तालुक्यातील 9 तांड्यावर गोर सेना शाखा  फलकाचे अनावरण*...  प्रतिनिधी/  देवणी तालुक्यातील मौजे इंद्रा नगर,लक्ष्मण तांडा,सेवादास नगर,नेकनाळ,वसंतराव नाईक, धनेगाव आदी तांड्यावर गोर सेना शाखा फलकाचे अनावरण संगटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  बंजारा समाजावरील होणाऱ्या  अन्याय,अत्याचार,हक्क व अधिकार यासाठी संपूर्ण भारतात सामाजिक स्वरूपात काम करणारी अग्रगण्य संगठना म्हणुन गोर-सेनेचा ऊल्लेख केला जातो.    त्याचा एक भाग म्हणुन आज देवणी तालुक्यातील नऊ तांड्यावर या सामाजिक संगटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेशभाऊ चव्हाण यांच्या उपस्थतीत गोर-सेना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.   यावेळी गोर सेनेचे जिलाध्यक्ष अशोक चव्हाण,देवणीचे तालुकाध्यक्ष गुरूनात पवार,जिल्हा संघटक बालाजी राठोड,जिल्हा सह संघटक बालाजी पवार,संतोष पवार,शरद राठोड,दयानायक राठोड,महादेव जाधव,दयानंद राठोड,प्रकाश राठोड आदी देवणी तालुक्यातील गोर सेनेच्या तांड्यावरील कार्यकत्यांची उपस्थिती होती.

गुरुवारी नव्याने २५ रुग्ण वाढले तर १३ रुग्णांना सुट्टी

गुरुवारी नव्याने २५ रुग्ण वाढले तर १३ रुग्णांना सुट्टी   हिंगोली - जिल्ह्यात गुरुवारी नवीन २५  कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील सर्व रुग्ण हे  आरटीपीसीआरटी तापसणीत सापडले आहेत .तर १३ रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली  परिसर सात रुग्ण यामध्ये आनंदनगर ,मंगळवारा, रिसाला बाजार, खांबाळा,पोळा मारोती, डिग्रस कऱ्हाळे यांचा समावेश आहे. तर वसमत परिसरात सतरा रुग्ण आढळून आले आहेत. यात सहारा पेठ येथे १६ तर म्हातारगव्हाण येथे एक असे१७ रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय कळमनुरी परिसरात वारंगा मसाई येथे एक रुग्ण यांचा समावेश आहे. तर गुरुवारी १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील आठ , वसमत कोरोना केअर सेन्टर येथील एक , तर कळमनुरी सेंटर येथील चार  असे एकूण १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती अ...