हिंगोलीत नव्याने ३६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३४ रुग्ण कोरोनामुक्त
हिंगोलीत नव्याने ३६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३४ रुग्ण कोरोनामुक्त हिंगोली - जिल्ह्यात सोमवारी ३६ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात कही खुशी कही गम अशी अवस्था निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णात अँटीजन टेस्ट मध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही तर ३६ रुग्ण हे आरटीपीसीआर मध्ये आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३६ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत.यामध्ये ३६ रुग्ण आरटीपीसीआर तापसणीत आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर नऊ, तर वसमत परिसर अकरा, सेनगाव १६,असे ३६ रुग्ण आरटीपीसीआर तापसणीत आढळून आले आहेत. आज रोजी एकूण सुमारे ३४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.यात खालील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली बारा , कोरोना केअर सेंटर औंढा १३,तर सेनगाव येथील कोरोना सेन्टर ७ रुग्ण , कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे दोन अशा ३...