Posts

Showing posts from August 21, 2020

हिंगोलीत नव्याने १९ रुग्ण पॉझिटिव्ह तर ९४ रुग्ण कोरोनामुक्त

हिंगोलीत नव्याने १९ रुग्ण पॉझिटिव्ह तर ९४ रुग्ण कोरोनामुक्त जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख घसरतोय  हिंगोली -  जिल्ह्यात शुक्रवारी १९ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर सुमारे ९४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख आता घसरत चालला असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता कमी झाली आहे. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णात यातील अकरा रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले तर आठ रुग्ण हे आरटीपीसीआर मध्ये आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी  दिली आहे.   जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १९ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत.यामध्ये ११ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये तर ८ रुग्ण आरटीपीसीआर तापसणीत आढळून  आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर सात,  तर औंढा परिसर तीन, कळमनुरी एक, असे ११ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. तसेच आरटीपीसीआर तापसणीत ८ रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर तीन, कळमनुरी चार, वसमत एक असे आठ रुग्ण सापडले आहेत. आज रोजी एकूण तब्बल ९४ रु...