Posts

Showing posts from August 17, 2020

हिंगोलीत सोमवारी कोरोनाचे  नवीन नऊ रुग्ण, तर एकाचा मृत्यु

हिंगोलीत सोमवारी कोरोनाचे  नवीन नऊ रुग्ण, तर एकाचा मृत्यु  हिंगोली -  जिल्ह्यात आज ९ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्हआला असून एका सामान्य रुग्णालयातील एका ६५ वृद्धाचा कोरोना आजाराने मृत्यू  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी सोमवारी दिली आहे.  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नऊ रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये नऊ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर तीन, कळमनुरी परिसर चार, औंढा परिसर दोन, एकूण असे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. आज रोजी एकूण१६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.आजपर्यंत एकूण बारा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूची संख्या तेरा झाली आहे.यातील बरे झालेल्या मध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली येथील१४,वसमत कोरोना सेंटर येथील एक, कळमनुरी सेंटर येथील एक असे सोळा रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद वसाहत चार, जिजामाता नगर हिंगोली एक, गाडीपुरा एक, कोथळज एक, पिंपळ खुटा एक, शास्त्री नगर वसमत एक, औंढा नागनाथ दोन, सेनगाव दोन, वसमत एक, कळमनुर...

जिल्ह्यातील ४६५ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती 

जिल्ह्यातील ४६५ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती  जिल्हा परिषदेचे सीईओ शर्मा यांनी काढले आदेश हिंगोली - जिल्ह्यातील (ता.१८) ते ३१ ऑगस्ट अखेर मुदत संपलेल्या ४६५ ग्रामपंचायतीच्या प्रशासकांच्या नियुक्त्याचे आदेश सोमवारी (ता.१७) जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा यांनी काढले असल्याने प्रशासक नियुक्तीचा तिढा सुटला आहे. मागील सहा महिन्यापासून संपूर्ण भारतात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा २०२० मध्ये राज्यातील ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका देखील निवडणूक विभागाने रद्द केल्या आहेत.यापूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करून त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रशाशक नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने काढले होते. यामुळे राजकीय पक्षांचा कार्यकर्त्यांचा भरणा होईल या भीतीपोटी काहींनी आक्षेप नोंदविला होता, तर काहींनी न्याया लयात धाव देखील घेतली आहे. तर काहींनी राजकीय पक्षाचे नेते न घेता यावर शासकीय सेवितील व्यक्तीलाच प्राधान्य द्या असा काहीसा सूर होता. त्यानंतर राज्य शासनाने ग्रामपंचायत वर ...

हिंगोलीत विविध मागण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Image
हिंगोलीत विविध मागण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन कामकाज ठप्प, कार्यालय ओस हिंगोली -  येथील  नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी  सोमवारी एक दिवशीय काम बंद  आंदोलन अग्निशमन दल परिसरात केल्याने कामकाज ठप्प पडले तर कार्यालय देखील ओस पडले होते.  महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, नगर परिषद हिंगोली यांच्या वतीने आज एक दिवशी काम बंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील प्रमुख मागण्यात सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देणे, शंभर टक्के वेतन शासनाच्या कोषागार कार्यालयातून देण्यात यावे, नगर परिषद पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी समावेशन करणे, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी समावेशन करणे, अभियंता अग्निशमन दल लेखा व अधिकाऱ्यांना प्रशासकीय सेवांच्या निवड श्रेणी लागू करणे, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध आराखडा तयार करणे, सफाई कर्मचार्‍यांना मोफत घर बांधून देणे, सफाई कर्मचार्‍यांना शासकीय सुट्टी तसेच रविवार शनिवार सुट्टी लागू करण्यात यावी, स्वच्छता निरीक्षकांचा संवर्ग तयार करणे, २००५ च्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस...