हिंगोलीत नव्याने ४४ पॉझिटिव्ह
हिंगोलीत नव्याने ४४ पॉझिटिव्ह हिंगोली, - जिल्हात रविवारी (ता.१६) नव्याने ४४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून ३७ जणांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यापैकी २९ हे रेपिड अॅन्टीजन टेस्टद्वारे व १५ रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले. तर ३७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण ११७८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७८९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ३७७ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि बारा रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.