Posts

Showing posts from August 15, 2020

हिंगोलीत कोरोनाचे  नवीन ४४ रुग्ण, तर एकाचा मृत्यु

हिंगोलीत कोरोनाचे  नवीन ४४ रुग्ण, तर एकाचा मृत्यु  हिंगोली -  जिल्ह्यात आज ४४ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी शनिवारी ता. १५ दिली आहे.  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर पाच  व्यक्ती, कळमनुरी परिसर तीन  व्यक्ती, औंढा परिसर चार  व्यक्ती, वसमत परिसर दोन  व्यक्ती असे एकुण १४  रुग्ण हे  रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर हिंगोली २५ व्यक्ती,सेनगाव पाच व्यक्ती असे एकूण ३० रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत.  तसेच आज कोरोना मुळे एका जणाचा मृत्यू झाला असून ३६  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी नऊ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर  तीन  रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण बारा  रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरा...

खाजगी रुग्णालयाने कोरोना रुग्णास टाळाटाळ केल्यास कारवाई करणार

खाजगी रुग्णालयाने कोरोना रुग्णास टाळाटाळ केल्यास कारवाई करणार जिल्हा शल्य चिकित्सक यांचा इशारा हिंगोली - महात्मा फुले जण धन आरोग्य योजनेतील कोरोना रुग्णास खाजगी रुग्णालयात उपचार न मिळाल्यास किंवा टाळाटाळ केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले अंगीकृत योजने अंतर्गत येत असलेल्या खाजगी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी यांना दिला आहे. जिल्ह्यात काही खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत उपचार सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र हे खाजगी रुग्णालय उपचार न करताच निधी हडप करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे जिल्ह्यातील ज्या खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले योजने अंतर्गत रुग्णांना मोफत उपचार करण्याची परवानगी दिली आहे, मात्र हे रुग्णालय केवळ नावालाच असून सरकारी रक्कम वसूल करीत आहेत असे निदर्शनास आल्याने, जिल्हा शल्य चिकितस्क यांनी तातडीने विराट कौन्सिलची दखल घेत शासन मान्य अंगीकृत असलेल्या खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार सुरू व्हावेत असे काळविले होते,एकूण खाटा पैकी८० टक्के ख...