जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २४ रुग्ण; तर एकाचा मृत्यु
जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २४ रुग्ण; तर एकाचा मृत्यु हिंगोल - जिल्ह्यात मंगळवारी २४ नवीन कोरोनाच्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर चार व्यक्ती, कळमनुरी परिसर आठ व्यक्ती, वसमत परिसर एक व्यक्ती, सेनगांव परिसर चार असे एकुण १७ रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर विठ्ठल नगर वसमत एक व्यक्ती, शास्त्री नगर वसमत एक व्यक्ती, वसमत नगर एक व्यक्ती, जवळा ता. वसमत एक व्यक्ती, असोलेवाडी ता. कळमनुरी एक व्यक्ती आणि सेनगांव शहर दोन व्यक्ती असे एकूण सात रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तसेच आज कोरोना मुळे एका जणाचा मृत्यू झाला असून दहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या तीध रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप...