चिंताजनक ; हिंगोलीत नव्याने २५ कोरोना पॉझिटिव्ह, तर १६ रुग्ण कोरोनामुक्त
चिंताजनक ; हिंगोलीत नव्याने २५ कोरोना पॉझिटिव्ह ,तर १६ रुग्ण कोरोनामुक्त हिंगोली - रविवारी प्राप्त अहवालानुसार हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन २५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी तीन रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व २२ रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट द्वारे आढळून आले आहेत,तर १६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी द्वारे विद्यानागर ,इंदिरा नगर कळमनुरी प्रत्येकी एक,तर औंढा नागनाथ ता जिंतूर भिलज येथील एक असे तीन रुग्ण सापडले आहेत. आज रोजी एकुन ४३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन येथील आठ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा दोन, तर कळमनुरी केअर सेंटर येथील ३३ जवान कोरोनामुक्त झाले आहेत. असे एकूण ४३ रुग्ण आज बरे झाले आहेत. तर आरटीपीसीआर द्वारे घेण्यात आलेल्या मध्ये जिल्हा रुग्णालय हिंगोली दोन,पोस्ट ऑफिस हिंगोल...