Posts

Showing posts from August 7, 2020

दिलासा;  हिंगोली, शुक्रवारी १२ कोरोना पॉझिटिव्ह ,८ रुग्णांची कोरोनावर मात

दिलासा;  शुक्रवारी १२ कोरोना पॉझिटिव्ह ,८ रुग्णांची कोरोनावर मात हिंगोली -   प्राप्त अहवालानुसार  जिल्हयात शुक्रवारी नव्याने एकुन १२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी नऊ रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे तर तीन  रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत व आठ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली  असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे. रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी मध्ये फलटन हिंगोली एक बासंबा ता. हिंगोली दोन, बसस्टँड कळमनुरी पाच, ब्राह्माण गल्ली कळमनुरी एक असे नऊ रुग्ण अँटीजन रॅपिड तपासणीतून आढळून आले आहेत. तर आरटी पीसीआर व्दारे आढळून आलेल्या असोनंडा औंढा एक, शिवाजीनगर सेनगाव एक, रामगल्ली हिंगोली एक, असे तीन रुग्ण मिळून आले आहेत.   आज रोजी एकुन आठ रुग्ण ठणठणीत बरे  झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद वसाहत दोन, तोफखाना तीन, गाडीपुरा एक, पेन्शनपुरा एक, महादेववाडी एक अशा आठ जणांचा समावेश आहे.  जिल्हयात आजघ...