Posts

Showing posts from August 5, 2020

हिंगोलीत नव्याने वीस रुग्णांची भर

हिंगोलीत नव्याने वीस रुग्णांची भर हिंगोली -  हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन २० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी १२ रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व ८ रुग्ण आरटीपर टेस्ट ब्दारे आढळून आलेले आहेत व ११  रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात  असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.  रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे पॉझिटीव्ह आलेले रुग्ण बाधीत परिसर संख्या वर्गवारी फलटन हिंगोली ५ ९ वर्ष पुरुष ,३५ वर्ष पुरूष ,२७ वर्ष स्त्री ,.५ वर्ष पुरूष , ६० वर्ष स्वी , ७ वर्ष स्त्री रामाकृष्णा सीटी हिंगोली ४५ वर्ष स्त्री, विवेकानंद नगर हिंगोली ३२ वर्ष पुरुष, ३ वर्ष पुरुष, ३० वर्ष स्त्री शेवाळा ता.कळमनुरी, १ पुरूष ब्राम्हण गल्ली, कळमनुरी ४३ वर्ष पुरुष असे एकुण  १२ रुग्ण आढळून आले आहे. आरटी पीसीव्दारे आढळून आलेले रुग्णात रिसाला बाजार हिंगोली  ३० वर्ष स्त्री, मेहराज कॉर्नर हिंगोली ४२ वर्ष पुरुष, पोस्ट ऑफिस रोड हिंगोली  ३३ वर्ष पुरुष, ३ वर्ष पुरुष शिवाजी नगर हिंगाली , ४१ वर्ष पुरुष फलटन हिंगोली, ३ ९ वर्ष पुरुष, ३७ वर्ष स्त्री ७५ वर्ष पुरुष  असे...

आजचे नवे पॉझीटीव्ह 45 तर 93 रॅपिड टेस्टचे एकूण 138

Image
आजचे नवे पॉझीटीव्ह 45 तर 93 रॅपिड टेस्टचे एकूण 138 (04 ऑगस्टचे ) -------  आजपर्यंतचे एकूण रुग्ण 2833 सध्या उपचार सुरू असलेले 1202 आजपर्यंत बरे झालेले 1631 एकूण मृत्यू   111   1.  लातूर ता . - 68 2.  औसा  ता. -12 3.  उदगीर --11 4. चाकूर -- 5 ( + नळेगाव 4 ) 5.  निलंगा ता.--12 6.  अहमदपूर ता --10 7.  शिरूर अनंत.-- 02 8.  देवणी ता. --04 9.  किल्लारी -- 02 10. रेणापूर -- 01   घरी राहा सुरक्षित राहा  प्रशासनास सहकार्य करा  👉👉 👉👉👉👉

शेतकऱ्यांच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविले

Image
शेतकऱ्यांच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविले शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला  आयएएस हिंगोली - वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा सुरेश  शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे . मुलागा अधिकारी झाल्याचा आनंद आई - वडिलांना झाला आहे.  वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील सुरेश कैलासराव शिंदे यांचे शिक्षण पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेत झाले . इयत्ता सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण झाल्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण रोकडेश्वर विद्यालय पांगरा शिंदे येथे झाले . त्यानंतर त्यांनी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला . महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले . त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली . सन २०१२ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सन २०१५ साली पूर्ण केला . या अभ्यासक्रमात ८२ टक्के गुण मिळव...

हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण 

Image
हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण  हिंगोली -  आज  प्राप्त अहवालानुसार जिल्हाधिकारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना  कोरोनाची बाधा झाल्याने जिल्हा कचेरीतील कर्मचाऱ्यामध्ये कार्यालयात जावे किंवा नाही याची धास्ती घेतली आहे. मागील तीन दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये सानिटाईझ करून तीन दिवस कामकाज बंद ठेवले आहे. या अधिकाऱ्याला कोरोना बाधा झाल्याची घटना ताजी असताना त्यापाठोपाठ कोरोना विषाणूने जिल्हा कचेरीतील बड्या अधिकाऱ्याला देखील सोडले नाही. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवार पासून१४ दिवसाचा लॉकडाऊन लागू केला आहे. आता तर जिल्हाधिकारी यांनाच  कोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. जिल्हा कचेरीतील कलेक्टर यांचे स्वाब नमुने सोमवारी घेतले होते. त्याचा अहवाल बुधवारी आरोग्य यंत्रणेकडे प्राप्त होताच हा अहवाल पॉझिटिव्...

 माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

Image
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन बुधवार, 5 ऑगस्ट 2020 दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर त्यांनी मात केली होती.  लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंञी डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यांच्यावर आज निलंग्यात आज अंत्यसंस्कार होणार आहेत.  निलंगेकर हे 1985 ते 86 या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत.   शिवाजीराव निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले आहे. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी यावर यशस्वीपणे मातही केली. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट...