दिलासादायक; हिंगोली, मंगळवारी ३३ रुग्णाची कोरोनावर मात तर नऊ पॉझिटिव्ह
दिलासादायक; हिंगोली, मंगळवारी ३३ रुग्णाची कोरोनावर मात तर नऊ पॉझिटिव्ह २३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक हिंगोली - सामान्य रुग्णालयाच्या प्राप्त आकडेवारीनुसार मंगळवारी ३३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पुन्हा नव्याने नऊ रुग्णाची भर पडली आहे. यातील २३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्य चिकितस्क डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील सहा एसआरपीएफ जवान,तर सामान्य रुग्णालयातील २७रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये गाडीपुरा एक, इंदिरा नगर एक,नवा मोंढा दोन, आझम कॉलनी पाच, वंजारवाडा पंधरा,मेहराज कॉर्नर एक, जीप वसाहत एक,आदर्श नगर एक यांचा समावेश आहे. तसेच सोमवारी सात रुग्ण आढळून आले आहेत. तर १९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये गाडीपुरा एक,विठ्ठल कॉलनी हिंगोली एक,नगर परिषद कॉलनी एक,पलटण हिंगोली एक अँटीजन तपासणी द्वारे पॉझिटिव्ह आला आहे.कासारवाडा एक, रेल्वे परिसर, चोंढी वसमत येथ...