धक्कादायक ; हिंगोलीत शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ५६ रुग्ण बाधित
धक्कादायक ; हिंगोलीत शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ५६ रुग्ण बाधित ५ रुग्ण बरे तर एका ८० वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू हिंगोली - जिल्हयात प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवारी तब्बल नव्याने एकुन ५६ बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. तर पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.तर यातील आठ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले असून, श्रीनगर येथील एका ८० वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी पत्रकारांना दिली. जिल्हा रुग्णालयाकडून गुरुवारी प्राप्त अहवालानुसार पाच कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . यामध्ये कळमनुरी कोरोना सेंटर येथील दोन,वसमत दोन, लिंबाळा यांचा समावेश आहे. आज रोजी हिंगोली जिल्हयात ५६ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . यामध्ये हिंगोली शहरातील देव गल्ली येथील एक पुरुष, जिल्हा परिषद वसाहत तीन यात एक पुरुष, एक स्त्री, तेरा वर्षाची एक मुलगी, तोफखाना एक, मंगळवारा एक, सवड एक, चोंडी स्टेशन वसमत एक,जवाहर कॉलनी वसमत एक,एसआरपीएफ हिंगोली येथील ३३ जवान, जवाहर कॉलनी वसमत च...