हिंगोलीत नव्याने आठ कोरोना रुग्णांची भर, एकाचा मृत्यू ३६ रुग्णाची कोरोनावर मात हिंगोली, - हिंगोली जिल्हयामध्ये बुधवारी नव्याने एकुन ८ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . त्यातील १ रुग्ण अॅन्टीजन तपासणीत पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे व एका कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला असून ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. आज सापडलेल्या रूग्णांत हिंगोली येथील नाईक नगर , येथील ५९ वर्षीय महिला ,वंजारवाडा येथे १ वर्षाचा मुलगा, तलाबकट्टा येथील ३५ वर्षाची महिला, आझम कॉलनी येथे ५६ वर्षाचा पुरुष, रिसाला बाजार येथे १ पुरुष ,एस.आर.पी.एफच्या एका ३१ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. हिवरा ता. कळमनुरी येथील ४४ वर्षीय पुरुष, वसमत तालुक्यातील शिवपुरी येथील ३६ वर्ष महिलेचा समावेश आहे. दरम्यान, हिंगोली येथील कासारवाडा येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या आजाराने मृत्यु झाला आहे. विशेष म्हणजे आज ३६ कोरोना योध्यानी कोरोना वर विजय मिळवीत र बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . आयसोलेशन वा...