हिंगोलीत मंगळवारी आणखी १० रुग्ण बाधित , तेरा रुग्णांना सुट्टी आतापर्यन्त सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
हिंगोलीत मंगळवारी आणखी १० रुग्ण बाधित , तेरा रुग्णांना सुट्टी आतापर्यन्त सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू हिंगोली - जिल्हयात प्राप्त आकडेवारीनुसार मंगळवारी नव्याने एकुन १० बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. तर १३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यन्त जिल्ह्यात सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा रुग्णालयाकडून मंगळवारी प्राप्त अहवालानुसार तेरा कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . यामध्ये पाच रुग्ण सेनगाव येथील आहेत. तर कळमनुरी कोरोना केअर सेंटर तीन,वसमत दोन, जिल्हा सामान्य आयसोलेशन वॉर्डातील तीन यांचा समावेश आहे. आज रोजी हिंगोली जिल्हयात १० नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . यामध्ये हिंगोली महादेववाडी ३५पुरुष, पेन्शनपुरा येथील१५वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तोफखाना येथे दोन ३५पुरुष, २७वर्ष महिला, श्रीनगर येथे ८० वर्ष पुरुष,यशवंतनगर ४२ वर्ष पुरुष, गाडीपुरा येथे साठ वर्षाची महिला,तर अष्टविनायक नगर येथे ४० वर्ष महिला, हिंगोली तालुक्यातील सवड येथे एका २८ वर्ष पुरुष...