कोरोना मीटर सुरूच; शनिवारी पुन्हा नव्याने २३ जणांना कोरोनाची लागण
कोरोना मीटर सुरूच; शनिवारी पुन्हा नव्याने २३ जणांना कोरोनाची लागण अँटीजन टेस्ट मध्ये १५ रुग्ण सापडले हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शनिवारी( ता.२५) प्राप्त अहवालानुसार २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये १५ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये सापडले असल्याने जिल्ह्यात कोरोना मीटरचा आकडा वाढत असून लिंबाळा क्वारंटाइन येथील मृत्यू झालेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना मीटर काही उपाय योजना केल्या तरी थांबण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा ५५६ च्या घरात गेला आहे. आज प्राप्त अहवालानुसार कोरोना रुग्ण आढळून आलेल्या पैकी १५ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये सापडले आहेत. यातील हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील१५ रुग्ण आहेत. यामध्ये ३५,३६,७५,५२,४४वर्ष महिला३२,२६,३०,३७,१९,३२,१८,वर्ष पुरुष असून यात८,५,वर्षाचा मुलगा असून सात महिन्याचा बाळाचा समावेश आहे. आझम कॉलनी येथील तिघे असून यामध्ये ६०,३० वर्ष पुरुष तर ५०वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. पुन्हा एका आझम कॉलनी येथील ८० वर...