Posts

Showing posts from July 24, 2020

धक्कादायक ;  हिंगोलीत पुन्हा २७ कोरोना पॉझिटिव्ह 

धक्कादायक ;  हिंगोलीत पुन्हा २७ कोरोना पॉझिटिव्ह  अँटीजन टेस्ट मध्ये चार रुग्ण आढळले ,दिवसेंदिवस आलेख वाढतोय हिंगोली -  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री साडे आठ वाजता  प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये चार रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये सापडले  असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार श्रीवास यांनी दिली.  कोरोना रुग्ण आढळून आलेल्या पैकी हिंगोली  पंचशीलनगर ६० वर्षीय एक पुरुष,मंगळवारा येथील दोन६३,५२,वर्षीय पुरुष, नवा मोंढा येथे दोन यात  ४९,२०,पुरुष ,तालाब कट्टा येथील४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गोलनदाज गल्ली येथील एका ३२ वर्ष पुरुष, इंदिरा नगर येथील एक २७ वर्ष पुरुष, काझीपुरा येथील५० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय आझम कॉलनी  येथील तिघे जण असून यात२४ स्त्री, दोन वर्षांची मुलगी, चार महिन्याचा मुलगा यांचा समावेश आहे.तसेच जुने पोलीस ठाणे येथील३०,६०,पुरुष तर २१ वर्षाच्या महिलेला लागण झाली आहे. साहू नगर येथे चार, तर जिल्हा परिषद वसाहत दोन, एसआरपीएफ एक, आखाडा बाळापूर तीन, स्त्री रु...

संचारबंदी काळातील निर्बंधावर 25 ते 31 जुलै पर्यंत  अंशत: बदलचे आदेश जारी*

* संचारबंदी काळातील निर्बंधावर 25 ते 31 जुलै पर्यंत अंशत: बदलचे आदेश जारी* लातूर,दि.24-(जिमाका)-कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे लॉकडाऊन दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आले होते. परंतु लातूर जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातुन खबरदारीचा उपाय म्हणून लातूर जिल्हयात दिनांक 15 जुलै 2020 ते 30 जुलै 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.   काही आस्थाापना अत्याहवश्यजक बाबी / सेवा मर्यादित स्वैरुपात व निर्बंधासह सुरु ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये  दिनांक 21 जुलै 2020 ते 24 जुलै  2020 या कालावधीकरीता कांही बाबींकरीता शिथीलता देण्याबत आली होती...

हिंगोली - बापरे हिंगोलीत एकाच दिवशी ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

बापरे हिंगोलीत एकाच दिवशी ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ४३ रुग्ण सापडले अँटीजन टेस्ट मध्ये ,१३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर हिंगोली -  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री उशिराने प्राप्त अहवालानुसार शहरातील पाच कंटेनमेन्ट झोन मध्ये गुरुवारी अँटीजन तपासणी करण्यात आली यामध्ये ४३ रुग्ण सापडले असून एकूण एकाच दिवशी ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले  तर १३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार श्रीवास यांनी दिली. शहरात ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासना च्या वतीने तो परिसर सील करून कंटेन मेन्ट घोषित केला जातो .सध्या शहरात पाच कंटेनमेन्ट झोन असून यात तोफखाना कंटेनमेन्ट झोन मध्ये १२१ नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली त्यापैकी १०९ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १२ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. मंगळवारा झोन मध्ये एकूण ९५ नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी८५ अहवाल निगेटिव्ह तर १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तलाबकट्टा झोन मध्ये ९९ व्यक्तीची तपासणी केली असता ९५ अहवाल निगेटिव्ह तर चार अहवाल पॉझिटिव्ह, याच प्रमाणे ...