हिंगोलीत नव्याने १२ जणांना कोरोनाची बाधा, दोघांचा मृत्यू
पुन्हा मुंबई, पुणे कनेक्शन ; हिंगोलीत नव्याने १२ जणांना कोरोनाची बाधा, दोघांचा मृत्यू दोन दिवसात चौघांचा मृत्यू , हिंगोली -बुधवारी प्राप्त अहवालानुसार हिंगोली जिल्हांतर्गत नव्याने १२ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . आणि या पैकी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला असून, दोन दिवसात चौघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. आज प्रॉत अहवालानुसार हिंगोली येथील श्री नगरातील ३८,२२, वर्षीय पुरुष हा कोरोना जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत,रिसाला बाजार येथील २०,२७ पुरुष हे राजस्थान मधून गावी परतले आहेत. तर गायत्री नगर येथील २२ वर्षीय पुरुष हा पुणे येथून आला आहे. शहरातील मस्तानशहानगर येथील तीस वर्षीय पुरुष हा मुंबई वरून परतला आहे, तालाब कट्टा येथील४५ वर्षीय तरुण हा बीड मधून गावी आला आहे. तसेच वसमत तालुक्यातील पारडी येथील५५ वर्ष पुरुष व ४० वर्ष स्त्री जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे. तर वसमत येथील शिवाजी नगर येथील ५५वर्ष पुरुष व ५०वर्ष स्त्री आयएलआय ताप, सर्दी, खोकला असल्याने तपासणी करण्यात आली त्यामध्ये हे दोघे पॉझिटिव्...