चिंताजनक ; हिंगोलीत एकाच दिवशी तब्बल २२ रुग्ण पॉझिटिव्ह
चिंताजनक ; हिंगोलीत एकाच दिवशी तब्बल २२ रुग्ण पॉझिटिव्ह सारी रुग्णाचा मृत्यू नंतर अहवाल पॉझिटिव्ह ,तर दहा रुग्णांची प्रकृती गंभीर हिंगोली - जिल्ह्यात सोमवारी रात्री साडे दहा वाजता प्राप्त अहवालानुसार एकाच दिवशी नव्याने २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली असून,काल सारीच्या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दहा रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा प्रशासनाची आणखी चिंता वाढली आहे. यामध्ये तालाब कट्टा कन्टेन्टमेन्ट झोन मधील कोविड अँटीजन टेस्ट तपासणी मध्ये पाच कोरोना रुग्णाचा समावेश आहे. कळमनुरी भाजी मंडई येथील८०,४२,२०,१७ स्त्री तर ४५, २२ पुरुषाचा समावेश असून कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. वसमत अशोक नगर येथील वीस वर्षीय पुरुष व सहा वर्षाचा मुलाचा समावेश आहे, तर शुक्रवार पेट येथील३६ वर्षीय स्त्री, हिंगोली आझम कॉलनी २८ वर्षीय पुरुष, तसेच हिंगोली येथील विठ्ठल नगर, श्रीनगर येथील एका ६० वर्षीय पुरुष, कासारवाडा येथील२५ वर्षीय पुरुष याशिवाय आरोग्य विभागातील४०,३२,४०,४२,३२ अश्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ता...