Posts

Showing posts from July 14, 2020

अभिनव गोयल यांची लातूर जिल्हापरिषद येथे सीईओ पदावर नियुक्ती

IAS transfer 14.7.2020 1) सौरभ कटियार   (mh 2016) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू पालकर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला या रिक्त पदावर 2) कुमार आशीर्वाद   (mh 2016) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली या रिक्त पदावर 3) श्रीकृष्णनाथ पांचाळ   (mh 2016) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया या रिक्त पदावर 4) इंदू राणी जाकर    (mh 2016) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या पदावर 5.अभिनव गोयल (mh 2016)प्रकल्प अधिकारी,किनवट तथा सहायक जिल्हाधिकारी नांदेड़ यांची लातूर जिल्हापरिषद येथे सीईओ पदावर नियुक्ती

कळमनुरी, सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात कळमनुरी -  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामाची अग्रीम रक्कम काढण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या येथील पंचायत समितीचा सहाय्यक लेखाधिकारी डी.एस. शिंदे यांना मंगळवारी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना अटक केली. याबाबत लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कळमनुरी येथील पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक लेखाधिकारी डी. एस. शिंदे यांनी तालुक्यातील एका ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन योजनेमधील स्वच्छतागृहाच्या बांधकामाची शिल्लक राहिलेली अग्रीम रक्कम काढून देण्याकरिता संबंधितांकडे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.  संबंधीत नागरिकाने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या नांदेड येथील अधीक्षक कल्पना बारावकर, ॲडिशनल अधीक्षक अर्चना पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक  हनुमंत गायकवाड,, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफुने, कर्मचारी ए. एस. कीर्तनकार, पी. एस....

लातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020  पर्यंत लॉकडाऊन राहणार 

वृत्त क्र.558                                              दिनांक:-14 जूलै 2020 लातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार  *संचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर  लातूर, दि.14(जिमाका):- जिल्ह्या त कोरोना विषाणुचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णीसंख्यात विचारात घेता कोरोना विषाणुच्याे संसर्गाची साखळी तोडण्या्च्याण दृष्टीयकोनातुन खबरदारीचा उपाय म्हवणून संपुर्ण जिल्ह यात संचारबंदी लागू करणे आवश्यवक असल्या्ने लातूर जिल्ह्या त दिनांक 15जूलै 2020 ते दिनांक 30 जूलै 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्या त आली असून या संचारबंदीच्याे कालावधीत विविध आस्थालपना व सेवांसंदर्भात या आदेशाद्वारे सविस्तपर निर्देश निर्गमीत करण्या त येत आहेत.   लातूर जिल्ह्या तील सर्व आस्थाापना दिनांक 15 जूलै 2020 ते 30 जूलै  2020 या कालावधीत पूढील निर्देशांना अधिन राहुन संपुर्णपणे बंद राहतील. ...

चिंताजनक; हिंगोली, मंगळवारी एकाच दिवशी तब्बल २८ रुग्ण पॉझिटिव्ह

चिंताजनक; मंगळवारी एकाच दिवशी तब्बल २८ रुग्ण पॉझिटिव्ह हिंगोली तालुक्यातील सर्वाधिक १९ रुग्णाचा समावेश हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये सर्वाधिक १९ रुग्ण हिंगोली तालुक्यातील आहेत.त्यापाठोपाठ वसमत तीन, सेनगाव, औंढा प्रत्येकी एकतर कळमनुरी तालुक्यात एकही रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी सांगितले.एसआरपीएफ जवानानंतर हा आकडा पुन्हा वाढला असल्याने  जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. शहरातील पेन्शनपुरा ,गोदावरी हॉटेल जवळ एक ४१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून ,त्याचा बाहेर गावावरून आल्याचा पूर्व इतिहास नाही. परंतु तो सारीच्या आजाराने रुग्णालयात भरती आहे. दुसरा रुग्ण जो३२ वर्षीय पुरुष असून तो औंढा तालुक्यातील अंजनवाडी येथील रहिवासी आहे.या व्यक्तीचा ही पूर्व इतिहास नसल्याने हा व्यक्ती देखील सारीच्या आजाराने रुग्णालयात भरती आहे. त्यानंतर सेनगाव बसस्थानक जवळील एका३५ वर्षीय पुरुषाला सर्दी, खोकला, ताप येत असल्याने रुग्णालयात भरती आहे. या व्यक्तीचा पण पूर्व इ...