विभागीय आयुक्तांची अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
विभागीय आयुक्तांची अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप कोरोनाबाबत उत्कृष्ट केलेल्या नियोजनाने आयुक्त भारावले हिंगोली - कोरोना रुग्ण बरे होण्यात हिंगोली जिल्हाने राज्यात अव्वल कामगिरी करून विभागात मानाचा तुरा रोवल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी (ता.१३)हिंगोली दौऱयांवर आले असता कोरोना बाबत आढावा बैठक घेऊन कोविड रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील बहरलेली वृक्ष पाहून अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.विशेष करून कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या परीचारिकेवर स्तुती सुमने उधळत अभिनंदन केले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नियोजन बद्ध मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कुमार प्रसाद श्रीवास ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार ,महसूल विभाग, पालिका प्रशासन ,पोलीस विभाग आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली .त्यामुळे रुग्ण बरे होण्यात राज्यात रिकव्हरी रेट कमी असल्याचे सांगून आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिक...