हिंगोलीत पुन्हा नव्याने चार रुग्ण पॉझिटिव्ह
हिंगोलीत पुन्हा नव्याने चार रुग्ण पॉझिटिव्ह रु ग्ण संख्या गेली ६० वर हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री साडे अकराच्या प्राप्त अहवालानुसार शनिवारी वसमत येथील ४४ वर्षीय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले असून तो सम्राट कॉलनी येथील आहे. तर ५७ वर्षीय गवळीपुरा येथील महिलेसह तालाब कट्टा हिंगोली, येथील दोघे असे आज चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या ६० वर गेली आहे. हिंगोली शहरातील रिसाला बाजार, तालांब कट्टा अंतर्गत कोरोना बाधा झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. प्रतिबंधात्मक बाबा म्हणून तेथील गरोदर महिला वयोवृद्ध नागरिक ज्यांना उच्य रस्क्तदाब आणि मधुमेहाचा आजार आहे .अशा३९ जणांचे थ्रोट स्वाब अहवाल तपसणीसाठी पाठविले होते. रिसाला बाजार येथील२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर तालाब कट्टा येथील१३ अहवाला पैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन अहवाल अनिर्णित आहेत.आणि नऊ अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. यामध्ये वीस गरोदर महिला व साठ वर्षाची वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. तसेच५७ वर्...