कळमनुरी दोन, वसमत नऊ, हिंगोली एक अशा बारा रुग्णाचा समावेश
चिंताजनक ; हिंगोलीत कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढतोय तर एक जण कोरोनामुक्त कळमनुरी दोन, वसमत नऊ, हिंगोली एक अशा बारा रुग्णाचा समावेश हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री पावणे अकराच्या प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड अंतर्गत एका५५ वर्षीय पुरुषाला सारीचा आजार झाल्याने त्यास भरती करण्यात आले होते. त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले असून तो नवल गव्हाण येथील रहिवासी आहे. ते कळमनुरी दोन, वसमत नऊ अशा बारा जणांना कोरोनाची बाधा झाली तर एक रुग्ण ठणठणीत बरा झाल्याने त्यास सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढत चालल्याचे आकडेवारी वरून दिसून येते, तर रुग्ण संख्या५६ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रसादकुमार श्रीवास यांनी दिली. कळमनुरी क्वारंटाइन सेंटर अंतर्गत उपचार घेत असलेल्या नव्याने दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे. यामध्ये रुग्ण क्रमांक एक याची तीन वर्षाची मुलगी चिखली येथील रहिवासी असून ती रुग्णाच्या संपर्कात आली होती. तर रुग्ण क्रमांक दोन हा ३८ वर्षीय नांदापूर येथील रहिव...