Posts

Showing posts from July 8, 2020

धक्कादायक.... परभणी जिल्ह्यात दिवसभरात 25 जण पॉझिटिव्ह. 

धक्कादायक.... परभणी जिल्ह्यात दिवसभरात 25 जण पॉझिटिव्ह.      परभणी 11, गंगाखेड 10, मानवत 2, पाथरी व सेलू 1.                      परभणी प्रतिनिधी,/-.      परभणी जिल्ह्या करिता बुधवार दिनांक 8 जुलै अतिशय धक्कादायक ठरला असून आज जिल्हाभरात तब्बल 25 कोरोना ग्रस्त नवीन रुग्णांची भर झाली आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा चांगलीच हादरली आहे.             गेल्या पंधरा दिवसापासून परभणी जिल्ह्यात कोरूना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील आठ दिवसाचा जर विचार केला तर दररोज 7,8 रुग्ण सापडत आहेत. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तर जिल्ह्यातून तसेच विदेशातून बऱ्याच नागरिकांची परभणीत दाखल झाले आहेत. हे दाखल होणारे नागरिक कुठलीही आरोग्य तपासणी न करता शहरासह तालुक्यात ये जा करत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या देखील दिवसागणिक वाढतच चालली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात एकूण पाच रुग्ण सापडले होते. परंतु रात्री अकरा वाजता आलेल्या अहवालानुसार परभणी जि...

चिंताजनक ; हिंगोलीत बुधवारी नव्याने १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले 

चिंताजनक ; हिंगोलीत बुधवारी नव्याने १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले  हिंगोली - येथील सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन  वॉर्डातपेडगाव येथील ६० वर्षीय पुरुष सारीच्या आजाराने भरती होता. आज प्राप्त अहवालानुसार त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे.तसेच सेनगाव, औंढा, कळमनुरी, लिंबाळा ,येथील रुग्णाचा समावेश असून बुधवारी अकरा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पस्ट झाले आहे. अंधारवाडी येथील क्वारंटाइन येथील३२ वर्षीय महिला व एक वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट असून तो तलाब कट्टा येथील असून, जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. तसेच औंढा तालुक्यातील  २५वर्षीय प्रसूती पश्चात महिला व५० वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असून या दोन्ही महिला औरंगाबाद येथून गावी परतल्या आहेत. याशिवाय लिंबाळा  क्वारंटाइन अंतर्गत भरती केलेल्या सहा रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यात  हानवतखेडा येथील १८ वर्षीय पुरुष असून तो मुंबई वरून गावी परतला आहे. तर एक भांडेगाव येथील २६ वर्षीय युवक असून तो मुंबई वरून परतला आहे. तर इतर चार जण हे कळमकोंडा येथील रहिवासी असूनवाळूज औरंगाबाद येथून परतले ...

कोरोणाला हरवण्यात हिंगोली राज्यात अव्वल

करोना रूग्ण बरे होण्यात हिंगोली राज्यात अव्वल हिंगोली -  कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या रिकव्हरी रेट मध्ये महाराष्ट्रातुन हिंगोली जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी 'मराठवाडा केशरी' शी बोलताना दिली. सध्या देशात तथा राज्यात व हिंगोली जिल्हयात परराज्यातुन , मेट्रोसीटीतुन दिनांक 14 मार्च पासुन ते ता. 07 जुलै पर्यंत जिल्हयात 47,766 नागरिक आले असुन या संपुर्ण नागरिकांची वैद्यकिय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , आशा स्वयंसेविका यांचे मार्फत तपासणी कण्यात आली .  यामध्ये कोरोना या आजाराची चिन्हे , लक्षणे आढळून आल्यास , त्यांना शासकिय क्वॉरन्टाईन करुन त्या व्यक्तीचा थ्रोट स्वॅब घेउन वैदकिय महाविद्यालय नांदेड येथे पाठविण्यात येत होते . तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली , पोलिस अधिक्षक , उपविभागीय अधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी , निवासी वैद्यकिय अधिकारी , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी , तहस...

हिंगोली : नूतन सीओ डॉ. कुरुवाडे यांचा शहरात दुचाकीवर फेरफटका 

Image
नूतन सीओ डॉ. कुरुवाडे यांचा शहरात दुचाकीवर फेरफटका   कन्टेन्टमेन्ट झोनची पाहणी , कोरोनाचा घेतला आढावा हिंगोली - येथील पालिकेचे नूतन सीओ डॉ. अजय कुरुवाडे यांनी पालिकेचा पदभार घेताच बुधवारी चक्क मोटारसायकल वर शहरात फेरफटका मारून रुग्ण आढळलेल्या कन्टेन्टमेन्ट झोनची पाहणी करून कोरोना संसर्ग चा आढावा घेतला. रामदास पाटील यांची मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी प्रमोशन झाल्याने त्यांच्या रिक्त जागी वाशिम जिल्ह्यातील कारंजा पालिकेचे डॉ. अजय कुरवाडे यांची शासनाने बदली केली. मंगळवारी कुरुवाडे यांनी आपल्या पदाचा पदभार घेऊन शहरातील चालू विकास कामांचा आढावा घेतला. तसेच कोरोना बाबत किती कन्टेन्ट मेन्ट झोन असून कुठे कुठे रुग्ण आढळले आहेत याची माहिती घेतली. बुधवारी  दुसऱ्या दिवशीच चक्क मोटारसायकलवर स्वारी करीत शहरात चालू असलेली कामे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण आढळून आलेल्या भागाची पाहणी केली. जिल्ह्यात कोरोनाचे त्रिशतक पूर्ण झाले असून यातील२६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला६३ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. हिंगोली शहरातील मस्तांशाह, गाडीपुरा, रिसाला, तलाबकट्टा भागात ...