धक्कादायक, आज पुन्हा लातूर 12, उदगीर 04 रुग्ण पॉझेटिव्ह
दिनांक 04.07.2020 लातूर 236 पैकी 192 निगेटिव्ह 16 पॉझिटिव्ह 11 Inconclusive 25 प्रलंबित व 02 रद्द १२ पॉझिटिव्ह (१० एलआयसी कॉलनी, १ खंडोबा गल्ली, १ बालाजी नगर), उदगीर positive पॉझिटिव्ह (१ नेत्रागाव, १ मोमीनपुरा, २ डिग्री रोड) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 73 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 52 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. उर्वरीत 17 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून 02 व्यक्तिचे स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. दिनांक 03.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 08 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 56 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 05 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी स...