हिंगोली : पुन्हा मुंबई कनेक्शन ; रशिया येथून परतलेल्यासह पाच जणांना कोरोनाची लागण
पुन्हा मुंबई कनेक्शन ; रशिया येथून परतलेल्यासह पाच जणांना कोरोनाची लागण कोरोना बाधितांची संख्या गेली३८ वर हिंगोली - बुधवारी प्राप्त अहवालानुसार एक २३ वर्षीय तरुण रशिया वरून पिंपळ खुटा येथे आला असून, त्यासह इतर पाच जण मुंबई, परभणी वरून हिंगोलीत दाखल झाले.त्यामुळे सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. वसमत येथील एका चाळीस वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट असताना तो व्यक्ती पुन्हा परभणी येथे शिक्षक असल्याने (ता.२५) परभणी येथे जाऊन आला त्यानंतर (ता.२७) रोजी त्याच्या आई सोबत नांदेड येथील खाजगी रुग्णालयात जाऊन आला. त्यास ताप, सर्दी, खोकला आल्यामुळे त्याचा स्वाब तपासण्यासाठी पाठविला आहे. त्यानंतर शहरातील लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर येथे भरती असलेला चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे. यामध्ये रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला तरुण हा पिंपळखुटा येथील रहिवासी आहे. तर दुसरा मुंबई येथून प्रगती नगर येथे परतला आहे. तसेच एक जण मुंबई येथून भांडेगाव येथे परतला आहे. याशिवाय औंढा येथील क्वारंटाइन सेंटर येथून एका चार वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालाव...