Posts

Showing posts from June 27, 2020

आज लातूर जिल्ह्यात एकूण 29 कोरोना रुग्णाची भर,  तर  एकाचा मृत्यू

Image
आज लातूर जिल्ह्यात एकूण 29 कोरोना रुग्णाची भर,  तर  एकाचा  मृत्यू    लातूर पॉझेटिव्ह : - भीम नगर -01, सूळ गल्ली - 01, शिव नगर - 01,  मारुती मंदिर साई -01, झिंगणाप्पा गल्ली - 01, कोईल नगर - 01,  अंबेजोगाई रोड -01,  गंगापूर - 01,   उदगीर  --- बनशेळकी रोड - 01, सुभाष रोड,  चौबारा - 01,  सुधा हॉस्पिटल -01,  रावणगाव -01 अहमदपूर : --- धानोरा :- 07 औसा : --- 06 भेटा,   बुधोडा 01,  सारोळा - 02   *जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 94, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 197 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 16. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 309. आज 7 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.*  

लातूर 16, उदगीर 03, औसा 09 रुग्ण पॉझेटिव्ह

Image
दिनांक 27.06.2020 लातूर  211 पैकी 171 निगेटिव्ह 29 पॉझिटिव्ह 09 Inconclusive 02 रद्द. *जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 94, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 197 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 16. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 309. आज 7 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.*   विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 55 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 41 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून एका व्यक्तीच्या स्वब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती बनशेळकी रोड, भीम नगर, सुळ गल्ली, शिवनगर, साई नगर, झीगणप्पा गल्ली, क्वाईल नगर,लातूर येथील व्यक्तीचा समावेश आहे.  एक व्यक्ती गंगापूर येथील आहे तर दुसरी व्यक्ती मिरकल ता. बस्वकल्याण जि. बिदर येथील आहे. महानगरपालिकेकडून 06 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 06 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...

नव्याने परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण तर पाच रुग्णांना सुट्टी

Image
पुन्हा मुंबई कनेक्शन; औंढ्यात नव्याने परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण तर पाच रुग्णांना सुट्टी हिंगोली,-  शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार औंढ्यात परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली असून ते दोघेही मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर इतर अकरा व्यक्ती दाखल झाले आहेत.तर पाच रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. शनिवारी मुंबई वरून परतलेल्या कोरोना लागण झालेल्या दोघांना औंढा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती केले आहे. सदरील दोन्ही रुग्ण हे चिंचवाडा वसई मुंबई येथील आहेत. सर्वव्हेक्षण करतेवेळी या दोघांना ताप आल्याने त्यांना आशा वर्कर यांनी थ्रोट स्वाब तपासणी करण्याचा सल्ला दिला होता.आणि होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले होते.त्यानुसार या दोघांनी मुंबई येथे( ता.२५) थ्रोट नमुने तपासणी साठी दिले होते.होम  क्वारंटाईन न राहता स्वतःच्या वाहनाने इतर अकरा व्यक्ती सोबत शनिवारी औंढा येथे दाखल झाले. दरम्यान, मुंबई येथील आशा वर्कर यांनी पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ता यांना दूरध्वनी करून...

बाळापुरात  राष्ट्रवादी काँग्रेसचे  जोडेमारो आंदोलन

Image
बाळापुरात  राष्ट्रवादी काँग्रेसचे  जोडेमारो आंदोलन पडवळकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे आ.बाळापुर -  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर याच्या  वक्तव्याचा जाहीर  निषेध व्यक्त करीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शनिवारी जोडेमारो आंदोलन करून पडवळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबदल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यां तर्फे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला नवीन बसस्थानका समोर जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार राजु नवघरे, जिल्हाध्यक्ष तथा पालिकेचे उपनगराध्यक्ष हिंगोली दिलीप चव्हाण, ठाकुरसिंग बावरी,श्रिंकात वाघमारे, बाबुराव वानखेडे, विलास सावंत, अभिजित देशमुख, शिवाजी शिंदे, उमेश गोरे, विजय गावंडे, योगेश पाटील, नदिम पठाण , र...

हिंगोलीत पुन्हा आठ जणांना कोरोनाची लागण 

Image
हिंगोलीत पुन्हा आठ जणांना कोरोनाची लागण  एका माहिलेसह सात पुरुषाचा समावेश   हिंगोली,- शुक्रवारी रात्री प्राप्त  अहवालानुसार औंढा तालुक्यातील भोसी येथील एका २२ वर्षीय गरोदर महिलेसह कळमनुरी तालुक्यातील सात व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. यात एसआरपीएफ जवान ,एक नोएडा तर तिसरा मुंबई वरून गावी परतला आहे इतर चार जनाना  कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कोरोना बाधित संपर्कातील असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २५९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण ३० रुग्णावर उपचार सुरू आहेत.तसेच कळमनुरी येथे १६ रुग्णावर उपचार सुरू आहेत यात काजी मोहला सहा, टव्हा एक, कवडा सहा , गुंडलवाडी दोन, बाबळी एक यांचा समावेश आहे. तर कोविड सेंटर कळमनुरी येथे चार रुग्णावर उपचार सुरू आहेत यामध्ये एसआर पीएफचे तीन जवान आहेत. तर वसमत येथे दोन रुग्णावर उपचार सुरु आहेत यात बुधवार पेठ एक, चांद गव्हाण एक यांचा समावेश आहे. याशिवाय लिंबाळा येथील केअर सेन्टर येथे पाच रुग्ण असून यात कनेरगाव नाका एक, संतुक पिंपरी एक, तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा ...