हिंगोली, एका २१ वर्षीय तरुणीचा कोरोनाने घेतला बळी ,रुग्ण संख्या जैसे थे
एका २१ वर्षीय तरुणीचा कोरोनाने घेतला बळी ,रुग्ण संख्या जैसे थे हिंगोली - केंद्रा खुर्द येथील एका२१ तरुणीला कोरोनाची लागण झाली होती.सदर तरुणीवर वाशिम, अकोला येथे उपचार सुरु असताना मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त होती.बुधवारी तिचा मृत्यू अकोला येथे झाला .तिच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.त्यांचे थ्रोट नमुने पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण२५१ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी२२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण२२ रुग्णावर उपचार सुरू आहेत. वसमत मध्ये दोन रुग्णावर उपचार सुरु आहेत यामध्ये एक बुधवार पेठ तर दुसरा चांद गव्हाण येथील रहिवासी आहे. तसेच कळमनुरी येथे दहा रुग्णावर उपचार सुरू आहेत यात काजी मोहला दोन, टव्हा एक, कवडा पाच, गुंडलवाडी दोन, यांचा समावेश आहे. तर कोविड सेंटर कळमनुरी येथे तीन रुग्णावर उपचार सुरू आहेत यामध्ये एसआर पीएफचेतीन जवान आहेत. याशिवाय लिंबाळा येथील केअर सेन्टर येथे पाच रुग्ण असून यात कनेरगाव नाका एक, संतुक पिंपरी एक, तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात जवळा बाजार ये...