कोरोंनाबाधीत रूग्णांनी शंभरी ओलांडली..परभणीतील तीघे पाॅजिटिव्ह
कोरोंनाबाधीत रूग्णांनी शंभरी ओलांडली........ परभणीतील तीघे पाॅजिटिव्ह परभणी,दि.24(प्रतिनिधी)- परभणी शहरातील प्रभाग क्रमांक सहामधील इक्बालनगर व प्रभाग क्रमांक सातमधील अपना काॅनर परिसरातील दोन व्यक्ती कोरोंनाबाधीत आढळल्या असून त्यामुळे कोरोंनाबाधीत रूग्णांच्या संख्येने शतकपार केले आहे. दरम्यान परदेशीवारी करून आलेल्या पाच व्यक्तींचे स्वॅब जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्या पाच व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी(दि.24) प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह आहे. बुधवारी(दि.24) 5 संशयित दाखल झाले असून एकूण संशयितांची संख्या 2613 एवढी झाली आहे. दरम्यान, नांदेड येथील प्रयोगशाळेकडून 8 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आले आहेत. बुधवारी 8 जणांचे स्वॅब नांदेड येथील प्रयागेशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंत 2812 स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यापैकी 2587 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 80 अनिर्णायक 47 स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल नांदेड प्र...