दिलासादायक ; वसमत येथील एका रुग्णाची कोरोनावर मात
दिलासादायक ; वसमत येथील एका रुग्णाची कोरोनावर मात जिल्ह्यात कोरोना बाधित२४ रुग्णावर उपचार सुरू हिंगोली - जिल्हा समान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत असलेल्या वसमत येथील सम्राट कॉलनीतील रुग्ण मंगळवारी ठणठणीत बरा झाल्याने त्यास सुट्टी देण्यात आली. आजघडीला जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर येथे एकूण२४ रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील आयसोलेशन व कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण२४८ रुग्ण आहेत. त्यापैकी२२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला एकूण२४ रुग्ण कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वसमत केअर सेंटर येथे एकूण कोरोना संक्रमित तीन रुग्णावर उपचार सुरु आहेत यामध्ये बुधवार पेठ एक, मुरुम्बा एक, चंद्रगव्हाण एक यांचा समावेश आहे. यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेन्टर येथे एकूण दहा रुग्ण आहेत. यामध्ये काजी मोहल्ला दोन, टव्हा एक, कवडा पाच, तर गुंडलवाडी दोन यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथील डेडीकेटेड हेल्थ सेंटर येथे त...