दिलासा ; हिंगोलीत नऊ रुग्णाची कोरोनावर मात
दिलासा ; हिंगोलीत नऊ रुग्णाची कोरोनावर मात २८ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू हिंगोली - शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डातील कोरोना चे नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कालगाव सहा, सिरसम एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक, या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या२३८ झाली असून यातील२१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला केवळ जिल्ह्यात२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याने जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये वसमत चार रुग्ण असून कुरेशी मोहला एक, बुधवार पेठ एक, अशोक नगर एक, मुरुम्बा एक यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी केअर सेंटर येथे एकूण पाच रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये दाती तीन, डोंगरकडा एक, टव्हा एक, यांचा समावेश आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत. याशिवाय कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत दोन रुग्ण भरती केले असून यात कन...