चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागण
चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागण ,कही खुशी कही गम आता रुग्ण संख्या पोहचली ३७ वर हिंगोली - मुंबई येथून सेनगाव तालुक्यात परतलेल्या एका१८वर्षीय तरुणाला क्वारंटाइन केल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे.सदरील युवक हा काहाकर बुद्रुक येथील रहिवासी आहे. तर दुसरी कळमनुरी येथील५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट दिसून येत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोना झालेले २३८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २०१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण २७ रुग्णावर उपचार सुरू आहेत.हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमत येथे एकूण चार रुग्ण आहेत त्यात एक कुरेशी मोहल्ला, एक बुधवारपेठ, एक अशोकनगर, एक मुरुंबा येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकूण पाच कोरोना रुग्ण आहेत यात तीन दाती येथील, एक डोंगरकडा, एक टव्हा येथील रहिवासी आहेत. ते उपचारासाठी भरती झाले आहेत. या सर्व रुग्णांची प...