Posts

Showing posts from June 15, 2020

लातूर 01 तर  उदगीर 06 पॉझिटिव्ह

Image
लातूर 01 तर  उदगीर 06 पॉझिटिव्ह विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 16 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात दिनांक 09.06.2020 रोजी खाडगांव रोड लातुर येथील  रहिवशी कोरोना (कोविड 19) पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे  रुग्ण दाखल झाला होता. सदर रुग्ण पुनम नगर ( अंधेरी) मुंबईवरुन प्रवास करुन आला होता. या रुग्णाचे पाच वर्षापूर्वी किडनी प्रत्यारोपण झाले होते व हा रुगण प्रत्यारोपणानंतर डायलिसीस व Immunosuppressants उपचार चालू  होते. या रुग्णालयात त्याचे दोन वेळा डायलिसिस करण्यात आले व मागील ०४ दिवसापासुन हा रुगण व्हेंटीलेटर वर होता . या रुग्णाचा उपचारादरम्यान दिनांक 15.06.2020 रोजी सायंकाळी ठीक 4.40 वा. मृत्यु झाला अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुखडॉ. मारुती कराळे यांनी दिली.                          ...

तेराशे रुपयांची लाच घेताना कृषी सहायक एसीबीच्या जाळ्यात

तेराशे रुपयांची लाच घेताना कृषी सहायक एसीबीच्या जाळ्यात कृषी केंद्र सुरू करण्यासाठी मागितली होती लाच, कृषी अधीक्षक कार्यालयात रचला सापळा हिंगोली -   कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी किटनाशके,खते, बियाणी विक्री साठी परवाना देण्यासाठी तक्रार दाराकडून तेराशे रुपयांची लाच घेताना लाचखोर कृषी सहाय्यक यास सोमवारी (ता.१५) कृषी अधीक्षक कार्यालयात सापळा रचला असता लाच स्वीकारताना त्यास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यामुळे कृषी अधीक्षक कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेनगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक प्रदीप शिंदे यांची जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर गुण नियंत्रण शाखा व सांख्यिकी शाखेचा पदभार दिला होता.तक्रादाराला कृषी केंद्र सुरू करून त्यात कीटकनाशके, रासायनिक खते, बियाणे विक्री साठी परवाना तयार करून त्यावर त्यांच्या ओळखीने कृषी अधीक्षक यांची स्वाक्षरी करण्यासाठी त्याचा मोबदला म्हणून शिंदे यांनी तक्रारदाराकडे  तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.या रकमे पैकी पूर्वी १ हजार ७०० लाच घेतली होती.उर्वरित तेराशे रुपयासाठी ...

दिलासा; हिंगोलीत सहा जणांनी केली कोरोनावर

  दिलासा; हिंगोलीत सहा जणांनी केली कोरोनावर  मात  बाधीत रुग्णसंख्या पोहचली ३६ वर हिंगोली -   येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डातील सहा रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना सोमवार (ता.15) डिस्‍चार्ज देण्यात आला असून यात दोन रिसाला बाजार येथील रुग्णांचा समावेश आहे. सध्या 36 रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.  आजपर्यत कोरोनाची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये दोन रुग्ण आहेत यात एक कुरेशी मोहल्‍ला, एक अशोकनगर येथील रहिवासी आहेत. ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्‍थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे पाच कोरोना रुग्ण आहेत यात जाम येथील एक, दाती तीन, तर एक डोंगरकडा येथील आहे. ते उपचारासाठी भरती असून त्‍यांची प्रकृती स्‍थीर आहे.   डेडीकेट कोविड हेल्‍थ सेंटर कळमनुरी येथे एक कोरोनाचा रुग्ण असून तो एसआरपीएफ जवान आहे. जो उपचारासाठी भरती होता त्‍याला विशेष काळजी म्‍हणून औरंगाबाद येथील धूत हॉस्‍पीटल मध्ये संदर्भीत करण्यात आ...

आज 02 कोरोना रुग्णाचा मृत्यू, (एक लातूर- 33 वर्षे एक उदगीर- 75 वर्षे )

Image
02 कोरोना रुग्णाचा मृत्यू, (एक लातूर- 33 वर्षे एक उदगीर- 75 वर्षे )

हिंगोलीत शासकिय कार्यालयांचे कामकाज ठप्प,जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन

Image
हिंगोलीत शासकिय कार्यालयांचे कामकाज ठप्प,जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन  राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कामबंद आंदोलनाला  संघटनांचा पाठींबा हिंगोली -  हिंगोली येथील निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना चुकीची वागणुक देणाऱ्या उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने सोमवारी (ता. १५) कामबंद आंदोलन  सुरु केले. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठींबा दिल्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.संघटनांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे निवेदन सादर केले. येथील निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांचे वाहन अडवून त्यांना चुकीची वागणून देण्यात आली. उपनिरीक्षक साईनाथ अनमोड यांनी प्रकरण मिटले असतांनाही सोशल मिडीयावर काही बाबी व्हायरल केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी हे अतिरिक्त दंडाधिकारी असतांनाही त्यांना उपनिरीक्षक अनमोड यांनी दिलेली वागणुक चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आज कामबंद आंदोलन करण्यात आले. यामध्ये महासंघाचे सचिव रामदास पाटील यांच्यासह उपविभागीय अ...