पहिल्याच मुसळधार पावसात सेनगाव ते नर्सी रोड वरील पूल गेला वाहून
पहिल्याच मुसळधार पावसात सेनगाव ते नर्सी रोड वरील पूल गेला वाहून सेनगाव तालुक्याचा संपर्क तुटला, पाच तास वाहतूक ठप्प सेनगाव - तालुक्यात रविवारी सकाळपासून पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते . पहिल्याच मुसळधार पावसाने सेनगाव ते नर्सी या रस्त्यावरील वळण रस्ता वाहून गेल्याने सुमारे पाच ते सहा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने सेनगाव तालुक्याचा संपर्क तुटला होता. तालुक्यात पावसाने आपली दमदार इंट्री मारून शेतकर्यात समाधानाचे वातावरण निर्माण केले आहे .रविवारी सकाळपासूनच पावसाने आपली सुरुवात दमदार स्वरूपात केली होती. आज दिवसभर पावसाने आपला मुक्काम ठेवत धो धो बरसत होता. त्यामुळे सेनगाव नर्सी रोडवरील पर्यायी पूल पूर्णता वाहून गेल्याने तालुक्यांचा जिल्ह्याशी संपर्क तुटल्यास कारणीभूत ठरला आहे. सेनगाव ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक महिन्यापासून चालू आहे ते काम पूर्णत्वास जाण्याच्या वाटेवर असताना महामार्गावरील नव्याने पूल काढण्याचे काम बाकी आहे. नर्सी नामदेव येथील गावाजवळील नवीन पुलाचे बांधकाम चालू असताना शिवालय...