Posts

Showing posts from June 13, 2020

कोरोना धमाका : लातूर जिल्यात 13 पॉझेटिव्ह, लातूर-05, उदगीर-05, लातूर ग्रामीण-03

Image
* 13 जून 2020*   11.35 PM * लातूर जिल्ह्यातील 112 व्यक्तीच्या स्वाबपैकी 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 91 अहवाल निगेटिव्ह* *जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 48, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 130 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8* लातूर, दि. 13(जिमाका):- लातूर जिल्ह्यातून दिनांक 13 जून 2020 रोजी 112 व्यक्तीच्या स्वाबचे नमुने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी आलेले होते.     त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकुण 39 व्यक्तीच्या स्वबची तपासणी करण्यात आले असून   04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून भुसार लाईन व शावली मोहल्ला लातूर 01, बाभळगाव व पाखरसांगवी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश bआहे. भुसार लाईन, सावली मोहल्ला व पाखर सांगवी येथील प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आज नव्याने आलेला आहे तर बाभळगाव येथील रुग्ण हा पूर्वीच्या संपर्कातील आहे.   उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून 33 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते त्यापैकी 5 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 4 व्यक्ती यापूर्वीच्...

तीन रुग्णाची कोरोनावर मात तर एकाला कोरोनाची लागण रुग्ण संख्या गेली  ३९ वर 

Image
तीन रुग्णाची कोरोनावर मात तर एकाला कोरोनाची लागण  रुग्ण संख्या गेली  ३९ वर  हिंगोली -  वसमत येथील कोविड केअर सेंटर येथे क्वारंटाईन केलेले तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर वसमत येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी उशिराने प्राप्त झाला आहे. वसमत येथील एका २७ वर्षीय नव्याने पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.तो अशोक नगर  येथील आहे.तसेच हयात नगर येथील तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोनाचे २२५ रुग्ण झाले असून त्यापैकी १८६ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ३९ रुग्णावर उपचार सुरू आहेत. तसेच कळमनुरी येथील कोविड केअर सेंटर येथे पाच रुग्ण असून यात जाम एक, दाती तीन, डोंगरकडा एक, येथील रहिवाश्यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. याशिवाय कळमनुरी येथे एका एसआरपीएफ कोरोना रुग्णाला उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्डा मध्ये एकूण ३० रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये चोंढी खुर्द पाच, सेनगाव ...

हिंगोलीत सिडीपीओची चार पदे अद्यापही रिक्तच.!

हिंगोलीत सिडीपीओची चार पदे अद्यापही रिक्तच.! प्रभारीवरच चालतो अंगणवाड्याचा कारभार हिंगोली - जिल्ह्यात बालविकास अधिकाऱ्यांची चार पदे मागील वर्षांपासून अद्यापही रिक्तच असल्याने अंगणवाड्यांचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यावरच  चालत असल्याने अंगणवाडीतील कामे वेळेत पूर्ण होत नाही.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेहमी ओरड असते .त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कायमस्वरूपी जागा भराव्यात अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्या चालविल्या जातात. यामधून एक हजार पेक्षा अधिक सेविका, मदतनीस यांच्याकडून झिरो ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, दंड घेर, वजन, लसीकरण,  तसेच रेकॉर्ड आदींची माहिती अपडेट करणे आदी कामे केली जातात. सेविका व मदतनीस यांच्यावर लक्ष ठेवून कामे वेळेत पूर्ण करून घेणे याची जबाबदारी मुख्यसेविका यांच्यावर असते. तसेच स्तनदा माता, किशोर वयीन मुली, गरोदर माता, यांच्या आहाराची काळजी घेतली की नाही, पोषण आहार, तपासणी आदी कामाचा आढावा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून बैठकातून घेतला जातो. जिल्ह्यात ...