Posts

Showing posts from June 12, 2020

लातूरचे 02 रुग्ण, बाभळगावत 01अहवाल पॉझेटिव्ह, तर 02 रुग्णाचा मृत्यू

Image
आज लातूरचे 02 रुग्ण, बाभळगावत 01अहवाल पॉझेटिव्ह तर 2 रुग्णाचा मृत्यू  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तापसणीसाठी महानगरपालिकेकडून आलेले दिनांक 11.06.2020 रोजीचे तीन व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.  पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही व्यक्ती क्रांती नगर लातूर येथील आहेत. दिनांक 12.06.2020 रोजी या संस्थेतील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर व्यक्ती बाभळगाव येथील असून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे          विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात दिनांक 06.06.2020 रोजी औसा तालुक्यातील एक स्त्री रुग्ण मुंबईवरुन प्रवास करुन आली असल्यामुळे व त्यांना खोकला, सर्दी, दम लागत असल्यामुळे या रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झाल्या होत्या. सदर रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासुन व्हेंटीलेटर वर होत्या त्यांचा उपचारादरम्यान दिनांक 11.06.2020 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान ...

चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागण ,२५वर्षीय महिलेचा समावेश

Image
चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागण ,२५वर्षीय महिलेचा समावेश ग्राफ मात्र वाढतोय, रुग्ण संख्या गेली  ४१ वर  हिंगोली - मुंबई वरून  वसमत मध्ये परतलेल्या एका २५ वर्षीय माहिलेसह , गुरुवारी कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील एका २० वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शुक्रवारी (ता.१२)प्राप्त झाला असून कोरोना बाधित महिला सम्राट कॉलनी येथील रहिवासी आहे. त्यामुळे कोरोनाचा ग्राफ वाढतच चालला असल्याने आता रुग्ण संख्या ४१ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना लागण झालेले आतापर्यन्त एकूण २२४ रुग्ण संख्या आहे. त्यापैकी १८३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ४१ पॉझिटिव्ह रुग्णावर कोविड सेंटर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. जिल्हानंतर्गत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वसमत येथील कोरोना केअर सेंटर  येथे पाच रुग्ण आहेत. यामध्ये  हयातनगर येथील एकूण तीन,कुरेशी मोहल्ला एक, सम्राट कॉलनी एक अशा पाच रुग्णा...

सीईओ शर्मा यांच्याकडून पाच गावातील विकासकामांची पाहणी 

Image
  सीईओ शर्मा यांच्याकडून पाच गावातील विकासकामांची पाहणी  नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या ,अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप हिंगोली -  पंचायत समिती अंतर्गत  रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. शुक्रवारी (ता.१२) फाळेगाव ,एकांबा, वांझोळा ,वडद ,माळहिवरा या पाच गावाना भेटी देत विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच गावकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत संवाद साधला. व गटविकास अधिकारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.  तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मुख्य प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा असल्याने नरेगा अंतर्गत  सार्वजनिक विहिरीची कामे सुरू करण्यात आली. त्यानुसार माळहिवरा येथे नरेगा अंतर्गत सार्वजनिक विहिरीचे काम हाती घेण्यात आले होते. यापूर्वी या ठिकाणी पाण्याची टंचाई होत असल्याने टँकर च्या साहाय्याने ग्रामस्थांना तहान भागवावी लागत असे. मात्र सार्वजनिक विहीर पूर्ण केल्याने आजघडीला या विहिरीला मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला असून माळ हिवरा गाव टँकरमुक्त झाले आहे. यासह इतर कामे पाहून सीईओ शर्मा यां...